बिबवेवाडी परिसरातील एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला आपल्या सर्वांचे प्रश्न, अडचणी आणि गरजा चांगल्याप्रकारे माहीत आहेत. परिसरातील प्रत्येक वस्ती, सोसायटी आणि गल्लीत जाऊन मी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
आपल्या विश्वासाने मला या वेळी नगरसेवक पदाची उमेदवारी देण्याची संधी मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून बिबवेवाडी परिसराचा विकास व्हावा, प्रत्येक नागरिकाच्या अडचणी वेळेत सोडवाव्यात, तरुणांना रोजगार व संधी मिळावी, तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर वातावरण निर्माण व्हावे हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
मी स्वतः एक सर्वसामान्य घरातून आलेलो असल्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न मला जवळून उमगतात. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे योग्य ती पाठपुरावा करून त्वरित तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असेल.
आपण दाखविलेल्या विश्वासाला न्याय देणे हीच माझी जबाबदारी आहे. बिबवेवाडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपले सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची अपेक्षा आहे.